राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील श्रीरामपूर रोडवरील वृंदावन कॉलनी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री.श्री. रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील श्रीरामपूर रोडवरील वृंदावन कॉलनी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री.श्री. रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार १३ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
वृंदावन कॉलनी येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून सकाळी ८ ते १२ या वेळेत रक्तदान, नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, आरोग्य चिकित्सा, हाडांचे विकार व अस्थीरोग आदींबाबत तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे.
सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत स्वामी शिवतेजजी व सचिनजी म्हसने यांच्या सानिध्यात भव्य सत्संग व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी शिबिर नावनोंदणीसाठी ८८३०४३९००७, ९६२३११४२१४,९९२२८२५३८५,७७७००७१८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार राहुरी, समस्त ग्रामस्थ राहुरी फॅक्टरी व पंचक्रोशी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत