राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील शेतकरी राजू भोंडवे यांचे चिरंजीव करूणेश भोंडवे यांनी बेलापूर येथे नव्याने सुरू केलेल्या एसीबी रेडिमेड या...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील शेतकरी राजू भोंडवे यांचे चिरंजीव करूणेश भोंडवे यांनी बेलापूर येथे नव्याने सुरू केलेल्या एसीबी रेडिमेड या कपड्याच्या दालनाचे आज राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक प्रशांत मुसमाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
बेलापूर येथील सरकारी दवाखान्यासमोर भोंडवे यांनी ब्रॅण्डेड जीन्स, ब्रॅण्डेड शर्ट, टी शर्ट सर्व एकाच ठिकाणी मिळावे या हेतूने एसीबी रेडिमेड्स हे दालन सुरू केले.
आज सायंकाळी मोठ्या दिमाखात या दालनाचा शुभारंभ युवा उद्योजक प्रशांत मुसमाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी विशाल मुसमाडे,जनार्धन ओहोळ, ज्ञानेश्वर भांड, कृष्णानंद महाराज आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवा उद्योजक प्रशांत मुसमाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले स्वतःचा व्यवसाय करत आहे, ही निश्चित भुषणावह बाब आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय बरोबरच इतर व्यवसायात शेतकरी हिरारीने पुढे येत आहे असे मुसमाडे म्हणाले.
यावेळी सर्वांचे आभार राजू भोंडवे, करूणेश भोंडवे यांनी मानले. कार्यक्रमास देवळाली प्रवरा परिसरातील कृषी, सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत