सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील श्री नर्मदेश्वर फाउंडेशन च्या वतीने कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात श्री ...
सोनेवाडी (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील श्री नर्मदेश्वर फाउंडेशन च्या वतीने कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात श्री महादेव मंदिराच्या अवतीभवती 12 हजार बेलाचे व 12 हजार कैलासपतीचे झाडे लावून धार्मिक अस्ता जोपासण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सागर केकान व उपाध्यक्ष अक्षय केकान यांनी सांगितले आहे.
30 मे रोजी या अभियानाला कुभांरी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचे महंत राघवेश्वरगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.महादेव मंदिराच्या समोर व आजूबाजूला बेलाचे झाड असेल तर शिवभक्ती वाढेल, शिवभक्ती वाढली तर हिंदूधर्म टिकेल व हिंदूधर्म टिकला तर हिंदुराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही असा या उपक्रमामाचा मागचा उद्देश असल्याचे सागर केकान यांनी सांगितले.उपक्रमाची सुरुवात तालुक्यातील मंहताच्या हस्ते करताना करताना फाउंडेशनचे अध्यक्ष सागर केकान, उपाध्यक्ष अक्षय केकान, तुषार केकान, दिलीप शिंदे, अशोक शिंदे, दीपक केकान, नरेश शिंदे, विशाल पाटील, प्रशांत केकान, ऋषिकेश आयान, महेश सांगळे, पांडुरंग शिंदे ,अशोक कातकडे, गणेश शिंदे ,अभिषेक केकान अदी उपस्थित होते.यावेळी महंत राघवेश्वरनंदगिरीजी महाराज यांनी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे कौतुक करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील 12000 हजार महादेव मंदिरासाठी 12000 बेलाचे झाडे व 12000 हजार कैलासपतीचे झाड 12 वर्षाच्या काळावधीत कुठेही खंड न पडता उपलब्ध करून दिले जाणार आहे.श्री राघवेश्वर मंदिर कुंभारी येथून झाडांची लागवड करून अभियान सुरू झाले आहे. 2023 या वर्षात कोपरगाव तालुक्यातील महादेव मंदिरासमोर बेलाचे व कैलासपतीच्या झाडाची लागवड करण्यात येईल जून 2024 पासून अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यामध्ये बेलाची व कैलासपतीचे झाडांची लागवड सुरू करुन संपूर्ण महाराष्ट्रात महादेव मंदिराच्या ठिकाणी हे झाले लावण्याचा संकल्प फाउंडेशनने बोलून दाखवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत