राहुरी (वेबटीम) बदल हि काळाची गरज आहे.आधुनिकतेची कास धरून शेती करावी.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. ब्राम्हणी ग...
राहुरी (वेबटीम)
बदल हि काळाची गरज आहे.आधुनिकतेची कास धरून शेती करावी.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.
ब्राम्हणी गावातील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीत नगर जिल्ह्यातील पहिल्या सीआयएफ प्रकल्पाच भूमिपूजन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे होत्या.सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेवून सुरू असलेली ग्रीनअपची वाटचाल कौतुकास्पद आहे. भविष्यात कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी आत्माचे राज्य प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, प्रक्रिया व नियोजनचे सहसंचालक सत्यवान वराळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे संचालक विलास नलगे,उपसंचालक राजाराम गायकवाड,तहसीलदार चंद्रजीत राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी अमोल काळे,तालुका कृषी अधिकारी अशोक गिरगुणे आदी प्रमुख उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे नितीन गवारे व ग्रीनअपचे चेअरमन अनिल हापसे यांनी स्वागत केले.प्रास्ताविक कृषी अधीक्षक बोराळे यांनी केले. ग्रीनअपचे कार्यकारी संचालक सचिन ठूबे यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे व गणेश हापसे यांनी केले.
भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ग्रीनअप मध्ये एकदिवसीय कृषी प्रदर्शनाच आयोजन करण्यात आल होत. स्मार्ट प्रकल्पात सहभागी विविध कंपन्यांचे उत्पादने पाहण्यासाठी उपलब्ध होती. शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय पूरक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीला नारळ व केशर आंबा रोपांचे वाटप देखील करण्यात आले. स्नेहभोजनाने कृषी प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता झाली.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.विक्रम कड यांनी कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं.
मॉडेल ठरलं आकर्षण
प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील मूल्य साखळी विकास मॉडेल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल.अनेकांनी या मॉडेल समवेत फोटोसेशन केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत