राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील नगर-मनमाड मार्गावरील नंदादीप व्हेज-नॉनव्हेज या हॉटेलचे उद्घाटन चैतन्य उद्योग स...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील नगर-मनमाड मार्गावरील नंदादीप व्हेज-नॉनव्हेज या हॉटेलचे उद्घाटन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या हस्ते संपन्न झाले.
टाकळीमिया येथील चांगदेव फटांगरे यांनी सुरू केलेल्या हॉटेल नंदादीपचे गुरुवारी सायंकाळी उद्योजक गणेश दादा भांड यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गणेश दादा भांड यांनी चांगदेव फटांगरे यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना गणेश दादा भांड म्हणाले की, कुठलाही व्यवसाय करत असताना नफा-तोटा याची चढ उतार सुरू असते. मात्र हे होत असताना सातत्य हे तितकेच गरजेचे आहे.
यावेळी शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव, श्री.पारखे, पोपटराव शेळके, रामफळे सर, नामदेव खरात, किरण देशमुख, अनिल शेंडगे, श्री.शिंदे, श्री.जाधव आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत