राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील येथील ग्रामदैवत श्री कानोबा कानिफनाथ मंदिरामध्ये पवित्र अशा अधिक श्रावण महिन्याचे औचित्य साधू...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील येथील ग्रामदैवत श्री कानोबा कानिफनाथ मंदिरामध्ये पवित्र अशा अधिक श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री नवनाथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.
गेले नऊ दिवस चाललेला हा पारायण सोहळ्याची गुरुवारी श्री कानिफनाथ महाराज आरती व विधिपूर्वक होम यज्ञ करून संपन्न झाला.यावेळी गावातील व पंचक्रोशीतील नाथ भक्त उपस्थित होते.
या पारायण सोहळ्याचे आयोजन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट गुहा व समस्त ग्रामस्थ गुहा यांच्या वतीने करण्यात आले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत