देवळाली प्रवराच्या मनीषा कदम यांची निर्सग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या नगर जिल्हा सचिवपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या मनीषा कदम यांची निर्सग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या नगर जिल्हा सचिवपदी निवड

अहमदनगर(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मनिषा संजय कदम यांची निर्सग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य...

अहमदनगर(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मनिषा संजय कदम यांची निर्सग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.



पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची जिल्हा पातळीवर दखल घेऊन  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) या संस्थेच्या जिल्हा सचिव पदाची जबाबदारी मनिषा कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


या निवडीचे पत्र निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ अध्यक्ष प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, जिल्हाध्यक्ष तुकाराम आडसूळ, श्रीमती लतिकाताई पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत