राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील राजूभाऊ शेटे मित्रमंडळ व हर हर महादेव ग्रुपयांच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील राजूभाऊ शेटे मित्रमंडळ व हर हर महादेव ग्रुपयांच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
याही वर्षी मोठ्या उत्साहात राजभाऊ शेटे मित्र मंडळ यांच्या वतीने चिंचेविहिरे येथे विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.
चिंचविहिरे येथील कार्यकर्ते कर्नाटक येथील यल्लमा देवी येथे ज्योत आणण्यासाठी दि.१० ऑक्टोबर रोजी रवाना झाले आहेत. कर्नाटक ते चिंचविहिरे असा हा त्यांचा प्रवास ५ दिवसांचा असणार आहे.त्यानंतर चिंचविहिरे येथे ज्योत पोहोचताच भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे.
ज्योत आणण्यासाठी मोठ्या संख्यने तरुण कार्यकर्ते कर्नाटकात रवाना झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत