राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज रविवार १५ ऑक्टोबर ते मंगळवार २४...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज रविवार १५ ऑक्टोबर ते मंगळवार २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रविवारी सायंकाळी ४ वाजता देवीची स्थापना व घटस्थापना देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, उद्योजक श्रीकांत चांडक, बाबासाहेब खांदे,मंडळाचे अध्यक्ष अमोल(बालू) कदम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सोमवार १६ ऑक्टोबर रोजी ४ वाजता अंबिकानगर आराध्या मंडळ आयोजित आराध्यांचा मेळा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसेच सोमवार १६ ऑक्टोबर ते बुधवार १८ ऑक्टोबर या कालावधीत रात्री ९ वाजता रामायणचार्य देवी भागवतकार ह.भ.प अमृतानंद महाराज कांकरिया(लातुरकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून वैष्णवी देवी महात्म्य कथा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजुभाऊ शेटे यांचे सौजन्य लाभणार आहे.
गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धा तर रात्री ९ वाजता चैतन्य नवदुर्गा(जिवंत देखावा) सांस्कृतिक कार्यक्रम, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय, राहुरी फॅक्टरी यांच्यावतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि.२० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० खिचडी महाप्रसाद वाटप तर ९ वाजता महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भागीनाथ बाबा राहिंज व सहकारी प्रस्तुत जागरण गोंधळ व धनगराची बानू चिमणी कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी बाबासाहेब खांदे, बापूसाहेब मुसमाडे, मयुर मोरे, सुजित सिनारे, बाळासाहेब वाळूंज यांचे सौजन्य लाभणार आहे.
शनिवार दि.२१ जुलै रोजी सकाळी १० वाजता लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व रोग निदान शिबिर संपन्न होणार आहे.
रविवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चित्रकला रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली.
तर रात्री ९ वाजता भव्य नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. तर सोमवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होमहवन व रात्री ८ वाजता सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडणार असून त्यानंतर झी टॉकीज फेम शिवशाहीर कल्याण महाराज काळे व सहकारी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवड्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता विजयादशमीनिमित्त देवीच्या मूर्तीचे विसर्जन संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत