देवळाली प्रवरा(वेबटीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीपूर्वी संपूर्ण देशात एकाच...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीपूर्वी संपूर्ण देशात एकाच वेळी स्वच्छांजली अर्पण करण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद द्वारे दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता 1 तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी बाजारतळ व्यापारी संकुल, शनी मंदिर बारीव परिसर, खंडोबा मंदिर परिसर, पद्मावती माता मंदिर परिसर, खांदे गल्ली,देवळाली नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गुरुकुल वसाहत इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच या अभियानात देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील नागरिक, दीनदयाळ अंत्योदय योजना, महिला बचत गटातील सदस्य, विविध सामाजिक संस्था, मित्र मंडळ, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवत देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसर स्वच्छ करण्यास मदत केली.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदचे मुख्याधिकारी तुषार आहेर , यांचेसह अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, महिला बचत गट सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत