देवळाली प्रवरात शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारणारी टोळी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारणारी टोळी जेरबंद

देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात  कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केल...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात  कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली असून एकूण ६ आरोपींसह पिकअप वाहन व इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

देवळाली प्रवरा येथील अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्रातून तर तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून  ८० हजार ५०० रुपये किंमतीचा कापूस चोरी गेल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी या चोरीच्या तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासाच्या आत ६ आरोपी पिकअप व इनोव्हा कारसह सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतली आहे.

सराईत गुन्हेगार करण माळी याने कापुस चोरी करण्यासाठीं टोळी बनवली होती त्यामध्ये १ पप्पू गुलाब बर्डे (राहुरी),२.ऋषिकेश मधुकर लोखंडे वय २१ वर्ष, ३. प्रज्वल सूर्यभान झावरे वय २० वर्ष, ४.प्रज्वल अशोक भांड वय १९ वर्षे ,५. विनीत संजय कोकाटे वय १८ वर्ष ६. अक्षय नारद ७.बन्नी बर्डे ८. प्रतीक बाळासाहेब बर्डे वय २१ वर्षे, ९. सचिन रमेश बर्डे उर्फ सचिन टीचकुले वय २१ वर्षे अशा मुलांनी मिळून टोळी बनवली होती


या गुन्ह्यामध्ये वरील पैकी १. प्रज्वल झावरे २. ऋषिकेश लोखंडे ३. प्रज्वल भांड ४. विनीत कोकाटे ५. प्रतीक बर्डे व ६. सचिन बर्डे उर्फ सचिन टीचकुले यास ताब्यात घेतले आहे,

 पोलीसांनी छपा टाकला तेव्हा करण माळी व पप्पु बर्डे हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून कापुस चोरण्यासाठी वापरला गेलेला टाटा एस क्रमांक एम एच ४४- ८३८२ व ईनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०१-एसी-४२७१ देखील ताब्यात घेतली आहे. 


हि कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल सम्राट गायकवाड यांनी केली आहे.


यापूर्वी पोलीसात दाखल असलेल्या कापुस चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींचा सहभाग आहे काय हे आता तपासले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत