राहुरी(वेबटीम) निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देश विचारात घेऊन ,ज...
राहुरी(वेबटीम)
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देश विचारात घेऊन ,ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक कामकाजाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्यात सध्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे व विभाग येथे अधिकारी नेमणूक करणे बाबत दिनांक 24 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पाडली.सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस स्थापना मंडळाचे अध्यक्ष सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून तसे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी काढले आहे. यामध्ये राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे यांची बदली करण्यात आली आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांची एक चांगले अधिकारी म्हणून ओळख आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात दोन्ही अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांची जिल्हा विशेष शाखा अहमदनगर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक पोपट कटारे यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत