देवळाली प्रवरातील एमबीबीएस परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील एमबीबीएस परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने सन्मान

देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दिलीप भोंडवे या मजुराच्या मुलाने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्त...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या दिलीप भोंडवे या मजुराच्या मुलाने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन नेत्र दीपक यश प्राप्त केल्याबद्दल चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने सन्मान करण्यात आला.


       देवळाली प्रवरा येथे दिलीप भोंडवे हे शेतमजूर म्हणून आपल्या पत्नीसह काबाडकष्ट करत असतात स्वतः कमी शिकलेल्या असले तरी आपल्या मुलाने उच्चशिक्षित व्हावे असा पहिल्यापासून या पती-पत्नीने उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला होता. त्यास त्यांचा मुलगा तुषार यांनी देखील साथ देत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला आणि तुषार दिलीप भोंडवे हा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (नाशिक) हिवाळी २०२३ यांनी नुकताच एमबीबीएस अंतिम वर्षाचा निकाल घोषित केला .यात  डॉ. तुषार दिलीप भोंडवे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.त्यांनी मुंबई येथील नायर हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे .


     त्यांच्या यशाबद्दल चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने चेअरमन गणेश भांड यांनी सन्मान केला. अबूबकार शेख, संतोष कुसकर, किरण देशमुख, नितीन खुरुद आदिंसह चैतन्य मिल्कचे कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत