लोकसभा निवडणूक निकाल पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले महत्वपूर्ण आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकसभा निवडणूक निकाल पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले महत्वपूर्ण आवाहन

    कोपरगाव(वेबटीम)    लोकसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक 16/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता (MCC) अंमलात असून ...

  कोपरगाव(वेबटीम)

 



 लोकसभा निवडणुक अनुषंगाने दिनांक 16/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता (MCC) अंमलात असून राहुरी अहमदनगर सह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे  करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डि.जे वाजवू नये. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.


व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 03/06/2024 ते दिनांक 06/06/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाही. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावि असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत