देवळाली प्रवरा(वेबटीम) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, इच्छुक उ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे, राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदार संघासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदार संघात भेटीगाठी घेऊन विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे, सत्यजित कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघात फिरून आढावा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या रविवार, दि. १ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा सोसायटी मंगलकार्यालय येथे संपन्न होणार आहे.
भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी सत्यजित कदम यांना मिळावी असा सूर मतदारसंघात आहे त्याबाबत काहींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा भेटीगाठी घेतल्या आहेत. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारीसाठी सत्यजित कदम यांचे नाव आघाडीवर होते परंतु अगदी शेवटच्या टप्प्यात माजी आ.शिवाजीराव कर्डीले यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा जवळपास ३० हजार मतांनी पराभाव केला होता, यंदाच्या निवडणुकीत सत्यजित कदम उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बरोबर मतदारसंघातील गावोगावी शासनाच्या योजनांचे व श्रावण महिना चालू असल्याने धार्मिकस्थळी शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहे. विधानसभेची तयारी म्हणून गावोगावी कार्यकर्त्यांचा भेटी घेत आढावा घेतला जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर काय भूमिका घ्यावी, निवडणुकीची तयारी आपल्या गावापासून कशी सुरू व्हावी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी रविवार, दि. १ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा सोसायटी मंगलकार्यालय मध्ये देवळाली प्रवरा शहरातील सर्व नागरिक, गावकरी, युवक व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक, गावकरी, युवक व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सत्यजित कदम यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत