राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष व शिर्डी संस्थ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष व शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांना पुणे येथील ग्रीन ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पतसंस्था व मल्टिस्टेट फेडरेशनच्या माध्यमातून सुरेश वाबळे यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन ग्रीन ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला होता. रविवारी पुण्यात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे माजी चेअरमन व कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. उज्ज्वल चव्हाण (आय.आर.एस.) यांच्या हस्ते श्री. वाबळे यांना गौरविण्यात आलेल.
यावेळी गौतम कोतवाल, चार्टड अकाऊंटट अभय शास्त्री, प्रेरणा मल्टीस्टेट संचालक दादासाहेब उरहे, श्रीकांत खर्डे, प्रा. विशाल वाबळे आदिंसह मान्यवर उपस्थित होत.
या पुरस्काराबद्दल माजी खा.प्रसाद तनपुरे, माजीमंत्री आ.प्राजक्त तनपुरे, पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी सुरेश वाबळे यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत