राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी नजीक हॉटेल साई पंचवटीसमोर राहुरी पोलिसांनी छापा टाकून राहुरी पोलिसांनी १५० गोमांस व वाहन जप्त करून र...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी नजीक हॉटेल साई पंचवटीसमोर राहुरी पोलिसांनी छापा टाकून राहुरी पोलिसांनी १५० गोमांस व वाहन जप्त करून राहाता तालुक्यातील ममदापुर येथील आरोपीस ताब्यात घेतले आहे. आज १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता ही कारवाई केली आहे.
नगर- मनमाड मार्गावरून छोटे हत्ती वाहनांमधून गोमांस घेऊन राहुरी कडे येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यानुसार हॉटेल साई पंचवटी समोर राहुरी कारखाना येथे सापळा लावला असता छोटा हत्ती एम एच १६ ए वाय 752 यास पकडून खात्री केली असता त्यामध्ये १५० किलो वजनाचे गोमांस आढळून आले.
यावेळी आरोपी मुस्ताक शेती कुरेशी वय 20 वर्ष रा.ममदापूर ता.राहता अहमदनगर या ताब्यात घेऊन पो का सतीश संजय कुराडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
22500/- रुपये किमतीचे गोमांस तसेच 3 लाख रुपये किमतीची १ छोटा हत्ती टाटा एस गाडी जप्त करण्यात आलेली आहे .पुढील तपास पो.हे.का बाबासाहेब शेळके करीत आहेत.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हेडकोन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे सतीश कुराडे, नदीम पठाण यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत