राहुरी(वेबटीम ) राहुरी-शहरातील राजवाडा येथील क्रांती चौकात नाताळ व नववर्षनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा शनिव...
राहुरी(वेबटीम)
राहुरी-शहरातील राजवाडा येथील क्रांती चौकात नाताळ व नववर्षनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा शनिवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा.आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांनी दिली आहे.
यावेळी भविष्यवक्ता प्रोफेट मुन्ना यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. राहुरी तालुका पास्टर फेलोशिप , आराधना टीम(पा.रवि सरोदे), पा.दीपक थोरात, पा.अविनाश सरोदे यांचा आराधना गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यानिमित्ताने जय भीम मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.
या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा व पत्रकार बांधवांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी आ.प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी तालुका मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन भारत भुजाडी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पास्टर गोरख दिवे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत