परभणीतील घटनेचा निषेधार्थ देवळालीत बंद पाळून निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

परभणीतील घटनेचा निषेधार्थ देवळालीत बंद पाळून निषेध

देवळाली प्रवरा/वेबटीम:- परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी  परभणी शहर बंद केल...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी  परभणी शहर बंद केले असता भीमसैनिकांना अटक करण्यात आले.यातील भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. 

या घटनेच्या  व गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अपशब्द निषेधार्थ बाबत आज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरात  बंद पाळून निषेध करण्यात आला. 



आंबेडकरी चळवळ, आरपीआय आठवले गट व इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. 

यावेळी  आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,कुमार भिंगारे,किशोर पंडित, गंगा गायकवाड, माऊली भागवत, दासू पठारे, राजू थोरात ,राकेश संसारे,सागर संसारे, सागर पंडित, संजय संसारे ,कॉ शरद संसारे ,मदिना शेख ,लालू पंडित ,बबन शेख सोमानाथ भागवत, विलास संसारे, विल्सन पंडित ,अनिकेत पंडित ,हरू संसारे ,अमित पंडित ,शशी पंडित दिगन पंडित, शंकर मकासरे, हर्षद शेख ,आयुब पठाण, विशाल पंडित आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत