देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली बंगला येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
प्रशांत मुसमाडे व विशाल मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाच्या शिवजयंती निमित्ताने देवळाली बंगला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठाचे संस्थापक प्रशांत मुसमाडे, गणेश सिनारे, अनिल मोरे, निखिल गोपाळे, सोमनाथ शिंदे, किरण चव्हाण, दीपक कोल्हे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार मुख्याध्यापिका श्रीमती ठाकूर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत