श्रीरामपूर(वेबटीम) अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर तथा आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्...
श्रीरामपूर(वेबटीम)
अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर तथा आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील श्रीरामपूर येथील पहिले दिव्यांग भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संस्था व संघटनेमार्फत श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांना मोठा आधार मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये संस्था संघटनेमार्फत शिबिरांचे आयोजन करून शेकडो दिव्यांगांना मोफत कृत्रिम साहित्य दिले गेली आहे. अनेक दिव्यांग बांधव त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याची नोंदणी या संस्थेकडे करीत असून संस्था विविध सामाजिक संघटना व समाजातील दानशूरांच्या सहकार्याने दिव्यांगांचे जीवन सुखद करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बैठकीदरम्यान यावेळी छ. संभाजीनगर येथील दिव्यागांच्या प्रश्नाकरिता बलिदान दिलेले दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रीरामपूर नगरपालिकेतील व पंचायत समिती अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायतीकडील ५% सेसफंड आतापर्यंत वितरित केला नसल्याने याबाबत चर्चा करण्यात आली. दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना, दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी गाळे, बँकेकडील कर्जासंबंधी तसेच ई - रिक्षा, ऑनलाइन रेल्वे पास तसेच संघटनेची तालुका व शहर कमिटी स्थापन करणे संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी मौजे बेलापूर बु., येथील वयोवृद्ध तसेच दोन्ही पायांनी पूर्णतः दिव्यांग निराधार नंदाताई जगन्नाथ क्षीरसागर यांच्याबाबत संस्था संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके यांना माहिती मिळाली. त्यांनी संस्था संघटनेमार्फत चालवलेल्या माणुसकीच्या भिंतीच्या अनुषंगाने प्राप्त झालेली तीनचाकी सायकल दिव्यांग बांधव रवींद्र करपे यांच्या मदतीने लागलीच नंदाताई क्षीरसागर मोफत भेट स्वरुपात यांना दिली.
यावेळी संस्था, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरखनाथ खडके, उपाध्यक्ष शंकरराव खैरनार, संपर्कप्रमुख राम डमाळे, भारत चौधरी, सुमित रहिले, रवींद्र करपे, इस्माईल शेख, राम उफाड, विजय साबळे आदी संघटना सदस्य व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत