गणेश पिंगळे यांना उत्कृष्ट 'स्विप नोडल अधिकारी' पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेश पिंगळे यांना उत्कृष्ट 'स्विप नोडल अधिकारी' पुरस्कार

श्रीरामपूर(वेबटीम) येथील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले खानापूर येथील जि.  प.सोमय्या फार्म प्राथमिक शाळेचे उपाध्यापक  गणेश व...

श्रीरामपूर(वेबटीम)



येथील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले खानापूर येथील जि.  प.सोमय्या फार्म प्राथमिक शाळेचे उपाध्यापक  गणेश वसंत पिंगळे यांना मतदार नोंदणी व जनजागृती कामी केलेल्या कार्यासाठी उत्कृष्ट 'स्विप नोडल अधिकारी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 



नुकत्याच पार पडलेल्या  १५व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बोरावके महाविद्यालय येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते गणेश पिंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेश पिंगळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या 'स्विप' कक्षाच्या वतीने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सातत्याने मतदार नोंदणी व जनजागृतीचे कामकाज केले. 'स्विप' उपक्रमात जिल्ह्याचा जागतिक स्तरावर गौरव होऊन तीन विश्वविक्रमांची नोंद झाली. तसेच प्रत्यक्ष निवडणूक कामकाजात सहभाग घेऊन प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडत विधानसभा निवडणुकीत ७० टक्केपेक्षा अधिक मतदान घडवून आणण्यात खारीचा वाटा उचलला. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन गणेश पिंगळे यांना उत्कृष्ट स्विप नोडल अधिकारी पुरस्कार देण्यात आला.

      याबद्दल गणेश पिंगळे यांचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, हेमलता वाकडे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, केंद्रप्रमुख राजू इनामदार, शिक्षक नेते नानासाहेब बडाख, सहा. महसूल अधिकारी अशोक नरोड, ओमराजे खुपसे, शिवाजी गायकवाड, संदिप पाळंदे, सागर माळी, विपुल गागरे, अवधूत कुलकर्णी, सोमनाथ पटारे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत