महाकुंभमेळ्यानिमित्त जुने नायगाव प्राथमिक शाळेत झाले कुमारीकांचे पूजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाकुंभमेळ्यानिमित्त जुने नायगाव प्राथमिक शाळेत झाले कुमारीकांचे पूजन

श्रीरामपूर(वेबटीम) तालुक्यातील नायगाव जुने प्राथमिक शाळेत प्रयागराज येथील महाकुंभमेळ्या निमित्त गावातील ग्रामस्थांनी शाळेतील कुमारीकांचे पूज...

श्रीरामपूर(वेबटीम)



तालुक्यातील नायगाव जुने प्राथमिक शाळेत प्रयागराज येथील महाकुंभमेळ्या निमित्त गावातील ग्रामस्थांनी शाळेतील कुमारीकांचे पूजन केले.



मागील आठवड्यामध्ये गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ नायगाव जुने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष जालिंदर राशिनकर,रामप्रसाद दातीर यांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची तीर्थयात्रा यशस्वी केल्याबद्दल सौ.पूजा निलेश लांडे,सौ.शोभा जालिंदर राशिनकर,सौ.संगीता रामप्रसाद दातीर,सौ.इंदुबाई संपत लांडे यांनी शाळेतील २६ कुमारिकांचे यथोचित पूजन करून शाळेतील २६ कुमारिका मुलींना प्रत्येकी एक गुलाबाचे फुल,एक नॅपकिन,एक पेन,केसाची पिन अशा उपयोगी वस्तू भेट दिल्या.


तसेच त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड लापशी व पुलावाचे जेवण दिले.संस्कृती व संस्कार मूल्य जोपासणारा एक आगळावेळा कार्यक्रम शाळेत घडवून आणल्याबद्दल सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी अभिनंदन करून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत