राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहतसह नर्सिंग होम कॉलनीत घरफोड्या लाखोंचा ऐवज लंपास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहतसह नर्सिंग होम कॉलनीत घरफोड्या लाखोंचा ऐवज लंपास

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक ठिकाणी घरफोडयांचे प्रकार सुरू असून काल मध्यरात्रीच्या गुरुकुल वस...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक ठिकाणी घरफोडयांचे प्रकार सुरू असून काल मध्यरात्रीच्या गुरुकुल वसाहतसह नर्सिंग होम कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.दरम्यान चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्या आधारे पोलिसांना तपास करणे सोपं होणार आहे.

 राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम कॉलनीतील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब शिरसकर  हे कामानिमित्त पुणे येथे गेले असता त्यांचा बंगला फोडून चोरट्यांनी त काही रोख रक्कम व वस्तू लंपास केल्या तर येथील देव्हारे यांच्या घरातील देखील  सोने व रोख रक्कम त्याचबरोबर शेजुळ यांच्या घरातील देखील काही रोख रक्कम व वस्तू चोरट्यांनी लंपास केली आहे.तर साळवे यांचा बंगला फोडून त्या ठिकाणी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात उचका पाचक  केली.

 मध्यरात्रीच्या दरम्यान या चोरट्यांनी तब्बल पाच घरे फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची घटना घडली आहे. तर एका घराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.,

मागील काही दिवसांपासून याच परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रात्रीची पोलीस गस्त या ठिकाणी करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत