राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील आर. के. सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा व जुने व्यापारी क्रिशनलाल संतराम महेंद्रु(वय-८५) वृद्धपकाळाने आज सोमवारी दुपा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील आर. के. सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा व जुने व्यापारी क्रिशनलाल संतराम महेंद्रु(वय-८५) वृद्धपकाळाने आज सोमवारी दुपारी ४ वाजता निधन झाले.त्यांच्यावर उद्या मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता, "निर्मल कृष्ण" अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे , जावई असा मोठा परिवार आहे.
अशोक, रमेश व अजय महेंद्रु यांचे ते वडील होत. क्रिशनलाल महेंद्रु यांनी प्रसादनगर येथील 'निर्मल कृष्ण' अमरधामसाठी २१ गुंठे जमीन दान केली होती.सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान कायम राहिले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत