राहुरी(वेबटीम) तालुक्यातील गणेगाव येथील वाणी शैक्षणिक संकुलातील सरस्वती वाणी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, तसेच वाणी औषध निर्माण शास्त्र म...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील गणेगाव येथील वाणी शैक्षणिक संकुलातील सरस्वती वाणी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, तसेच वाणी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. या दोन्ही महाविद्यालयांच्या डी फार्मसीचे निकाल ९९ टक्के लागले.
महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचा उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. सरस्वती वाणी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात डी फार्मसीचे भारती सुनील लाटे (८१.३६), पायल प्रकाश गोसावी (८१), साक्षी संग्राम अनाप (७६.८२) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती प्राचार्य शुभम घोलप यांनी दिली. वाणी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात डी फार्मसीचे विद्यार्थी आकाश विठ्ठल चोथे (८४.१८), सायली शंकर शिंदे (८०.१८), ओंकार बाळासाहेब अरंगळे (७८.६४) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती प्राचार्य ए. ए. बलसाने यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ वाणी, सचिव डॉ. दत्तात्रेय वाणी यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत