राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पॉलिटेक्निक कॉलेजला अखि...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पॉलिटेक्निक कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे. या कॉलेजमध्ये पाच अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दत्तात्रेय वाणी यांनी दिली.
गणेगाव येथे प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेतर्फे सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तसेच औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कार्यरत आहे. या शैक्षणिक संकुलात अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पॉलिटेक्निक कॉलेजची भर पडली आहे. या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तंत्र शिक्षण परिषदेने सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पाच तांत्रिक
अभ्यासक्रमांना मंजुरी दिली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी तीन वर्षांच्या डिप्लोमासाठी तांत्रिक अभ्यासक्रमांना
प्रवेश घेण्यास पात्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शालेय, वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबर तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचा दरवाजा उघडला आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव दत्तात्रेय वाणी व आदिनाथ वाणी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत