राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील रुपाली...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील रुपाली अजिंक्य बोरुडे यांना यश मिळाले आहे. त्यांची सहाय्यक अभियंता पीडब्ल्यूडी (वर्ग २ राजपात्रित अधिकारी) या पदावर निवड झाली आहे. त्यांची जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, स्टाफ सिलेकशन कमिशन या सर्व विभागांमध्ये स्पर्धा परीक्षा द्वारे कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली होती. गेल्या वर्षभरात स्पर्धा परीक्षेत हे त्यांचे चौथे यश आहे.
रुपाली या बी.ई सिविल, एम.ई स्ट्रकचर असून सध्या त्या जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले असतानाही आई सासू-सासऱ्यांच्या, मामा-मामींच्या पाठबळामुळे यशाला गवसणी मामा मामी यांच्या मार्गदर्शनाने एम. ई स्ट्रकचर पर्यंतचे उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केले. राहुरी पंचायत समिती माजी सदस्य कै. गुलाबराव बोरुडे व श्रीराम दूध संघांचे संचालक दिलीपराव बोरुडे यांचा त्या सुनबाई आहेत.
सासू-सासऱ्यांच्या रूपाने आई-वडील मलाभेटले त्यामुळेच मी हे यशाचे शिखर गाठू शकले, प्रत्येक मुलीला आई-वडील रुपी सासू-सासरे भेटले पाठबळ देणारे मामा-मामी सारखे नातेवाईक भेटले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्त्री शिक्षणाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समोर ठेवून उत्तम प्रशासकीय काम करणार असून सातत्याने अभ्यास, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, आयआयटीयन्स अॅकॅडमी, पुणे यांचे कोचिंग, तसेच पती इंजि. अजिंक्य बोरुडे, सासरे दिलीपराव बोरुडे, सासूबाई जयश्री बोरुडे व शोभा बोरुडे, दिर अॅड. सचिन बोरुडे (विधी अधिकारी) व राजेंद्र बोरुडे (प्रदेश सचिव युवा काँग्रेस), आई रेखा भालेराव, मामा उत्तमराव चव्हाण व गणेश साळवे (मा. पंचायत समिती सदस्य अहिल्यानगर), मामी सुनंदा चव्हाण व ज्योती साळवे तसेच सर्व परिवाराची साथ आणि प्रोत्साहन मिळाल्या मुळेच हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल अपंग संजिवनी सोसायटी चेअरमन मधुकर भावले, संचालिका विद्या भावले यांच्या वतीने व मुकबधिर परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत