राहुरी(प्रतिनिधी) राहुरी येथील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने पंचायत समितीतचे माजी उपसभापती रविंद्र आढाव यांनी पंढरपूरकडे निघालेल...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी येथील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने पंचायत समितीतचे माजी उपसभापती रविंद्र आढाव यांनी पंढरपूरकडे निघालेल्या विविध दिंड्यांना भेटी देत दिंडी चालकांचा यथोचित सन्मान करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहे. भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी व्हावा सर्व समाज बांधव एकत्रित गुण्या-गोविंदाने नांदावा अशी प्रार्थना यावेळी मा. उपसभापती रवींद्र आढाव यांनी पाडुरंग चरणी केली आहे.
शुक्रवारी सकाळपासून तालुक्यातील मानोरी येथील रेणुका माता दिंडी, वळण येथील गंगागिरी महाराज दिंडी, आरडगांव येथील विठ्ठल-रुक्मिणी दिंडी, केंदळ येथील श्री.विठ्ठल दिंडी, भवानी माता दिंडी, शिलेगांव येथील दगदंबा दिंडी, वांबोरी स्टेशन आदिंसह विविध गावांतील दिड्यांना भेटी देण्यात आल्या असून वारक-यांची अस्थेने विचारपूस करण्यात आली. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी हि परंपरा सुरू ठेवुन तनपुरे कुटुंबियांच्या वतीने आढाव यांनी वारक-यांना शुभेच्या दिल्या. याप्रसंगी माजी उपसरपंच आण्णासाहेब तोडमल, गोविंद फुणगे, वैभव पवार, संभुगिरी महाराज गोसावी, लक्ष्मण महाराज चौगुले, किशोर महाराज जाधव, योगिताताई शेळके, रिंधे महाराज, संजय महाराज म्हसे, चंद्रभान बोरकर, शिवचरण जगताप, शामराव भवार,ज्ञानदेव देशमुख,चंद्रकांत वायळ, प्रमोद तारडे, विजय चव्हाण, उत्तमराव आढाव, शामराव आढाव, बाळासाहेब पोटे,नामदेव पोटे,रायभान आढाव, बाबासाहेब खुळे, अरूण खिलारी, इंद्रभान पेरणे, संजय आढाव, भाऊसाहेब झुगे,लक्ष्मण भुसे,मधुकर आढाव, दत्तात्रय जाधव,रावसाहेब चुळभरे, बाबादेव काळे आदिंसह वारकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत