राहुरी(वेबटीम) आषाढी एकादशीच्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील लाख येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दिंडी सोहळा पार पडला. यावेळी टाकळीमिया...
राहुरी(वेबटीम)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील लाख येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दिंडी सोहळा पार पडला.
यावेळी टाकळीमिया येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य वारुळे सर , प्राध्यापक बोंबले सर पर्यवेक्षक जाधव सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र शेळके , तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब शिंदे, पत्रकार अक्षय करपे, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष संपत महाराज जाधव म्हणाले की, आषाढीनिमित्त बाळासाहेब जाधव विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून राबवित आहे. निश्चित कौतुकास्पद व प्रेरणादायी उपक्रम असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत