अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या

राहुरी (प्रतिनिधी)  सततच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिके, ...

राहुरी (प्रतिनिधी)



 सततच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिके, फळझाडे, भाजीपाला, चारा तसेच इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.


या संदर्भातील निवेदन राहुरी येथील नायब तहसिलदार सोपान बाचकर यांना देण्यात आले. या निवेदनाद्वारे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.


या प्रसंगी केसापूरचे माजी सरपंच दिपक पवार, ग्रामपंचायत सदस्य  रमेश नामदेव टाकसाळ, गणेश टाकसाळ, अनिल बोधक,  भानुदास टाकसाळ,  जालिंदर क्षीरसागर, बाळासाहेब शिंदे, सचिन मेहेत्रे, विनोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


पावसामुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नसून, शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठीचे रस्तेही अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत