डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव (वार्ताहर)  राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं ज...

पानेगांव (वार्ताहर)



 राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं जोडली असा गौरवोद्गार अहिल्यानगर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दशरथ दिघे यांनी धानोरे (ता. राहुरी) येथे सहा.पशुधन अधिकारी डॉ. संजय सुर्यभान दिघे यांचा सेवापुर्ती आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलतं होते.यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मला संजयचा निश्चितच अभिमान असून त्यांनी ३३ वर्षाच्या पशुवैद्यकीय सेवेत राहुरी संगमनेर राहाता तालुक्यात सेवा बजावली सेवा बजावत असताना आपले कुटुंब हेच पशुवैद्यकीय विभागाला मानलं सुट्टी असताना हि प्राण्यांच्या साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं.त्यांची तक्रार तालुका जिल्हा स्तरावर कधीच आली नाही. उलट बदली करु नये म्हणून शेतकरी आमच्या विभागाला अर्ज करत इतकं निस्वार्थी कार्य पशुवैद्यकीय विभागात डॉ संजय दिघे यांनी केले. यावेळी पशुधन विभागाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ प्रकाश लहारे, डॉ सुरेश घुले, डॉ नितीन निर्मळ, डॉ आस्तिक गागरे, डॉ. शिवाजीराजे फड, डॉ ठाकुर, डॉ दिलीपराव डांगे, चंद्रकांत म्हस्के,लक्ष्मणराव विखे, वसंतराव गोरे, ह.भ.प.लोंढे महाराज, महेश म्हस्के, मदनराव चौधरी, अनिकेत चौधरी, दत्तात्रय अंभोरे, सुनिल गोपाळे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, रविंद्र गावडे जयसिंग मोरे, दत्तात्रय धसाळ, विलास उंडे,सुधाकर मुसमाडे, केशवराव घोलप,किरण दिघे, ॲड.आप्पासाहेब दिघे, प्रा बाळासाहेब दिघे, पांडुरंग दिघे सर,आदी  मान्यवर उपस्थित होते. 

प्रास्ताविक प्रा.अविनाश दिघे यांनी केले सुत्रसंचलन सुखदेव दिघे सर आभार नंदकुमार दिघे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत