राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा तृतीय क्रमांक; राहुरी फॅक्टरीच्या खेळाडूंची चमक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा तृतीय क्रमांक; राहुरी फॅक्टरीच्या खेळाडूंची चमक

राहुरी/वेबटीम:-  १७ वर्षांखालील गटातील ४५ व्या राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृ...

राहुरी/वेबटीम:- 

१७ वर्षांखालील गटातील ४५ व्या राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा दि. १२, १३ व १४ मे रोजी तेलंगणा राज्यातील मेहमुदाबाद येथे पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसरे मानांकन मिळवले. विशेष म्हणजे, राहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लबच्या तीन खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत आपल्या खेळाची छाप पाडली.

संघात कुमारी सानिका किरण कोबरणे, श्वेताली दत्तात्रय गोपाळे आणि जान्हवी सोमनाथ जाधव या खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या या यशामुळे राहुरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या खेळाडूंना अम्युचर शुटींग व्हॉलीबॉल राज्य फेडरेशनचे सचिव सुनील कंठाळे, राज्य फेडरेशनचे सदस्य नाना काळे, अहिल्यानगर जिल्हा शुटींग व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक शेख, तसेच प्रशिक्षक राजेंद्र पुजारी व संदीप निबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशामुळे राहुरी फॅक्टरीच्या शिवनेरी क्लबच्या नावलौकिकात भर पडली असून आगामी स्पर्धांसाठीही या खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत