राहुरी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू; दर्जेदार शिक्षणाची सुवर्णसंधी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू; दर्जेदार शिक्षणाची सुवर्णसंधी!

राहुरी/वेबटीम:- डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना श्रीशिवाजीनगर संचलित, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील...

राहुरी/वेबटीम:-

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना श्रीशिवाजीनगर संचलित, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी सह विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तोडीचे दर्जेदार उच्च शिक्षण आपल्याच परिसरात मिळावे, या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये या महाविद्यालयाच्या आजपर्यंत तब्बल ३० विद्यार्थ्यांनी 'सुवर्णपदक' (Gold Medal) प्राप्त करून राहुरी परिसराचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढवला आहे. 

ज्ञान, गुणवत्ता आणि संस्कार या मूल्यांसोबतच विद्यार्थ्यांचे जागतिक स्तरावर करिअर घडवण्यासाठी महाविद्यालयात 'फॉरेन लॅंग्वेज' (परदेशी भाषा) शिकण्याची विशेष संधी  उपलब्ध होणार आहे.

 महाविद्यालयात इयत्ता अकरावी सोबतच वरिष्ठ महाविद्यालयाचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि विशेष मागणी असलेले बी.एस्सी. (कंप्युटर सायन्स) व बी.कॉम. (सीए - CA) हे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उच्च शिक्षणासाठी एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. हे पदव्युत्तर अभ्यासक्रमही येथे असून सर्वच स्तरांवर अनुभवी व तज्ञ प्राध्यापक कार्यरत आहे.

महाविद्यालयात सुसज्ज संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल समृद्ध ग्रंथालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी भव्य मैदान अशा अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर समुपदेशन, कौशल्य विकास कार्यशाळा आणि विशेष रोजगार (Placement) सेलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज शासकीय व नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांसाठी 'कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना' येथे प्रभावीपणे राबवली जाते, त्याचबरोबर सक्रिय 'राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) हे या महाविद्यालयाचे विशेष आकर्षण आहे.

 विद्यार्थ्यांनी आजच आपल्या मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा आणि आपल्या यशस्वी भविष्याची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अरुण तनपुरे, जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ दळवी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत