ताहाराबाद येथे अधिक मासानिमित्त सोमवारपासून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ताहाराबाद येथे अधिक मासानिमित्त सोमवारपासून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

ताहाराबाद(वेबटीम)  श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे अधिक मास तथा पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सो...

ताहाराबाद(वेबटीम)



 श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे अधिक मास तथा पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ८ जून ते १५ जून या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भागवताचार्य मनोहर महाराज सिनारे यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरूपण होणार आहे.

श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात श्रीमद् भागवत कथा, श्री संत कवी महिपती महाराज यांच्या हस्तलिखित भक्तविजय ग्रंथाचे पारायण, हरिपाठ आणि अभिषेक यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मनोहर महाराज सिनारे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून दहीहंडी व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.

अधिक मास पर्वणीनिमित्त ज्ञानदान व अन्नदान यज्ञाचेही आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी भव्य-दिव्य मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भटारखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध संत-महंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

श्री संत कवी महिपती महाराज मंदिर प्रांगणात प्रथमच भागवताचार्य मनोहर महाराज सिनारे यांची श्रीमद् भागवत कथा होत असल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राहुरी तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक कथा श्रवणासाठी ताहाराबाद येथे येणार असून त्यांच्या सुविधांसाठी देवस्थान व ग्रामस्थांनी व्यापक नियोजन केले आहे.

भाविकांसाठी आमटी-भाकरीच्या पंगतींचे आयोजन करण्यात आले असून कानडगाव, तुळापूर, निंभेरे, गुहा, गणेगाव, कणगर, वडनेर, मोमीन आखाडा, बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गाडकवाडी, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे, शेरी-चिखलठाण, म्हैसगाव, दरडगाव आणि कोळेवाडी आदी गावांचा त्यात सहभाग आहे.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे व मठाधिपती अर्जुनजी महाराज तनपुरे यांनी केले आहे.


धोंड्याच्या मिष्टान्न पंगतीचे आयोजन

“साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा” या ओवीप्रमाणे अधिक मासानिमित्त देवळाली प्रवरा व ताहाराबाद ग्रामस्थांच्या वतीने रविवार, दि. १४ जून रोजी सायंकाळच्या सत्रात धोंड्याच्या (पुरणपोळी व आमरस) मिष्टान्न पंगतीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत