देवळाली प्रवरा(वेबटीम) शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखपदी(देवळाली प्रवरासह ३२ गावे) मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता पाटील कडू यां...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखपदी(देवळाली प्रवरासह ३२ गावे) मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता पाटील कडू यांची तर देवळाली प्रवरा शहरप्रमुख पदी विजय कुमावत व उपजिल्हाप्रमुखपदी चिंचोली फाटा येथील सचिन लाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटाची कास धरली. त्यानंतर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक पुनर्बांधणीला सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्त्यांची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षसंघटना पुन्हा मजबूत करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
देवळाली प्रवरा येथील दत्ता कडू यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह ३२ गावांची जबाबदारी देण्यात आली असून येत्या काळात सेनेचे संघटन वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत