गायनाचार्य ह.भ.प. संदीप महाराज पारे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गायनाचार्य ह.भ.प. संदीप महाराज पारे यांचे निधन

वळण (वेबटीम) राहुरी तालुक्यातील वळण गावचे भूषण व संगीत अलंकार ह.भ.प. संदीपजी महाराज पारे यांचे रविवारी रात्री ११.२० वाजता हृदयविकाराच्या झटक...

वळण (वेबटीम)



राहुरी तालुक्यातील वळण गावचे भूषण व संगीत अलंकार ह.भ.प. संदीपजी महाराज पारे यांचे रविवारी रात्री ११.२० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह वळण परिसरात शोककळा पसरली आहे.

ह.भ.प. संदीप महाराज पारे यांनी आपल्या भक्तिरसपूर्ण गायनातून वारकरी संप्रदायाला वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यांच्या निधनाने संगीत व आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.

त्यांच्यावर आज सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वळण येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत