राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे....
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी परिसरातील नवनिर्मित जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
तसेच यावेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत आधुनिक स्वच्छता कम जेटिंग वाहनाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांच्या सुविधांसाठी करण्यात आलेल्या या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.चंद्रशेखर कदम तसेच अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नगरपरिषदेकडून नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भव्य तिरंगा रॅलीचेही आयोजन
तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी ९.३० वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी खा. सुजय विखे पाटील ,नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयापासून बाजारतळ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वृंदावन कॉलनीमार्गे श्री शिवाजीनगर (राहुरी फॅक्टरी) येथे रॅलीचा समारोप होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत