राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानतर्फे क्रीडा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानतर्फे क्रीडा संपन्न

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) भारतीय हॉकीचे महान खेळाडू तसेच ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून जगभर ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात र...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



भारतीय हॉकीचे महान खेळाडू तसेच ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून जगभर ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आजच्या मोबाईलच्या युगात शालेय मुले मैदानी खेळांपासून दूर जात असल्याने त्यांना मैदानी खेळांचे महत्त्व समजावे, शारीरिक तंदुरुस्ती वाढावी तसेच खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली.

यामध्ये 50 मीटर धावण्याची स्पर्धा तसेच दोरीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेमध्ये जय पवार यांनी प्रथम, महेश वाघ यांनी द्वितीय तर प्रतीक कुटे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरसेवक वसंत कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप विटनोर, तसेच अविनाश गायके, सुजित लोंढे, जालिंदर दोंड, मनोज तांबे, सुजित सिणारे, सुयोग सिणारे, अमोल मोरे, विजय मोरे, सोमनाथ गुंजकर, नितीन मोरे, अक्षय पेरणे, मयूर मोरे, राजेंद्र गावडे, दत्तात्रय उबाळे, पियुष झंवर यांच्यासह प्रतिष्ठानचे अनेक सभासद उपस्थित होते.


आजच्या डिजिटल आणि मोबाईलच्या युगात मुलांनी मैदानी खेळांकडे वळावे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना व जिद्द अंगीकारावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत