देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील गोदामाचे कुलूप तोडून दोन बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटनेचा राहुरी पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्य...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील गोदामाचे कुलूप तोडून दोन बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटनेचा राहुरी पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या २४ तासांत छडा लावला. चोरीप्रकरणी देवळाली प्रवरा येथील इस्लामपूरा भागातील जैद मुस्ताक सय्यद यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत देवळाली प्रवरा येथील किरण पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचा शोध घेतला. डीबी पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला २४ तासांच्या आत जेरबंद केले.
दरम्यान, या चोरीच्या प्रकरणामागे मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत असून, आरोपीकडे अधिक चौकशी सुरू आहे.
ही कारवाई राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रवीण बागुल, बाबासाहेब शेळके, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सचिन ताजने , सतीश कुऱ्हाडे , संदीप रोकडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत