राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड, आदिनाथ सर्व्हिस स्टेशनमागे (कराळेवाडी) येथे उभारण्यात येणार असलेल्या ‘पुष्प...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड, आदिनाथ सर्व्हिस स्टेशनमागे (कराळेवाडी) येथे उभारण्यात येणार असलेल्या ‘पुष्पारंभ' रेसिडेन्सी’ या नव्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकल्पामध्ये २ बीएचके अपार्टमेंट, रो-हाऊस तसेच कमर्शियल शॉप बिल्डिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधुनिक बांधकाम, आकर्षक रचना आणि परिसरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.
या शुभारंभ सोहळ्यास ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) व आ. प्राजक्त दादा तनपुरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तर डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे,माजी आ.चंद्रशेखर पा. कदम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, व्यावसायिक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक रंभाजी कराळे, रवींद्र कराळे, धनवटे ग्रुप ऑफ कंपनीजचे माणिक धनवटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
स्थळ : आदिनाथ सर्व्हिस स्टेशनमागे (कराळेवाडी), श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत