राहुरी फॅक्टरीत बिबट्याचा वावर वाढला; रहिवाशांमध्ये भीती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत बिबट्याचा वावर वाढला; रहिवाशांमध्ये भीती

राहुरी फॅक्टरी (वेबटीम) येथील वाणीमळा परिसरालगत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवासी व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)



येथील वाणीमळा परिसरालगत बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवासी व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैष्णवी चौकापासून वाणीमळा परिसराकडे जाणाऱ्या गायत्री शिक्षण संस्थेकडील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिबट्याने परिसरातील पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर बिबट्याचा वावर अधिकच वाढल्याची चर्चा असून, शेतकरी व रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या परिसरात शेतवस्ती तसेच रहिवासी मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, तसेच परिसरात वनविभागाने गस्त वाढवावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत