देवळाली प्रवरात अजित मुसमाडे यांना मारहाण राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अजित मुसमाडे यांना मारहाण राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथे ऊस तोडण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत मारामारी होऊन गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी फिर्याद अजि...

राहुरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथे ऊस तोडण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत मारामारी होऊन गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी फिर्याद अजित बाळासाहेब मुसमाडे यांनी राहुरी पोलिसांत दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी शेतातील ऊस का तोडला, असा जाब विचारल्याने वाद झाला. त्यावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रशांत रमेश मुसमाडे, लक्ष्मण उत्तम मुसमाडे व उत्तम कृष्णाजी मुसमाडे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत