प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात कानडगावच्या प्रगती माध्यमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात कानडगावच्या प्रगती माध्यमिक विद्यालयाचा प्रथम क्रमांक

  कानडगाव(वेबटीम) छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, पाथरे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात प्रगती माध्यमिक विद्यालय,...

 कानडगाव(वेबटीम)



छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, पाथरे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात प्रगती माध्यमिक विद्यालय, कानडगाव येथील विद्यार्थ्यांनी माध्यमिक विभागातून उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रगती माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ग्रामपंचायत कानडगावच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

ग्रामपंचायत कानडगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. निशाताई गागरे, उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे कानडगावच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत