भाजपा अल्पसंख्याक मोर्चा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा चंद्रशेखर कदम यांचे हस्ते सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा चंद्रशेखर कदम यांचे हस्ते सन्मान

देवळाली प्रवरा(वेबटीम)   भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चा अहिल्यानगर जिल्हा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देवळाली प्रवरा येथे माजी आमदा...

देवळाली प्रवरा(वेबटीम)


  भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चा अहिल्यानगर जिल्हा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देवळाली प्रवरा येथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.

      बागायत पीक उत्पादक सोसायटी च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, मच्छिन्द्र कदम, नगरसेवक प्रकाश संसारे, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण , बाळासाहेब लोखंडे, अजीज शेख, गणिभाई बागवान, अल्लाउद्दीन शेख, मुनीर शेख, समद शेख, हाजी नबीभाई शेख,आरिफ शेख, वासिम शेख, अल्फाज सय्यद, अन्वर सय्यद, सोहिल शेख उपस्थित होते. 

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा च्या उत्तर जिल्हा उप अध्यक्षपदी मोसीन शेख, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी उमर इनामदार, उप अध्यक्ष पदी आसिफ शेख, अन्सार शेख व अझहर शेख, देवळाली ग्रामीण च्या अध्यक्ष पदी इस्माईल शेख तर उप अध्यक्ष पदी दिलावर पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      नवनियुक्त पदाधिकारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. एम. डी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. अन्वर इनामदार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिलावर पठाण यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक ऐक्याची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे मा. आ. चंद्रशेखर कदम यांनी म्हटले.

नगरसेवक प्रकाश संसारे यांनी सूत्रसंचालन केले. शहरातील विविध संस्थाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष रउफ भाई शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत