राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद, देवळाली प्रवरा आणि सारीका एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद, देवळाली प्रवरा आणि सारीका एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी परिसरात जलतरण तलाव उद्या शनिवार २४ ऑक्टोबर पासून सुरू होत असून पोहण्याची आवड असणाऱ्या नागरिकांसह पोहणे शिकू इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
पोहणे हा शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व्यायाम मानला जातो. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना पोहण्याचा आनंद घेता यावा, तसेच नियमित व्यायामातून फिटनेस राखता यावा, या उद्देशाने जलतरण तलावाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या जलतरण तलावात अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवशिक्यांसाठी विशेष मार्गदर्शनाची सुविधा असून, महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅचची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित पोहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, स्वच्छता आणि शिस्तबद्ध वातावरण यावरही भर देण्यात येणार आहे.
जलतरण तलावाची वेळ सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ३ ते ७ अशी आहे. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या तसेच आरोग्य आणि फिटनेससाठी पोहण्याचा व्यायाम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
जलतरण तलावाचा पत्ता : वृंदावन कॉलनी, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी.
संपर्क : ९९२२९ ०९१९८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत