राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी वसंतराव गणपत पटारे (वय ८५) यांचे निधन झाले. ते परिसरात ‘मामा’ ...
राहुरी फॅक्टरी
येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी वसंतराव गणपत पटारे (वय ८५) यांचे निधन झाले. ते परिसरात ‘मामा’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे.
वसंतराव पटारे यांनी डॉ. तनपुरे साखर कारखान्यात टाइम ऑफीस विभागात आनंदाने सेवा बजावली. मनमिळाऊ स्वभाव, हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि सर्वांशी आपुलकीने संवाद साधण्याची वृत्ती यामुळे ते सर्वपरिचित होते. येता-जाता युवकांशी संवाद साधताना त्यांच्या मुखातून नेहमीच ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा ऐकायला मिळत असे. त्यांच्या या स्वभावामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
अंत्यसंस्कार बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता येथे करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत