राहुरी फॅक्टरीतील निर्मल कृष्ण अमरधामची दुरावस्था;गाडीचा लाईट लावून केला अंत्यविधी स्वच्छता न झाल्यास व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील निर्मल कृष्ण अमरधामची दुरावस्था;गाडीचा लाईट लावून केला अंत्यविधी स्वच्छता न झाल्यास व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील निर्मल कृष्ण अमरधामची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छत...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथील निर्मल कृष्ण अमरधामची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छता, पाण्याचा अभाव आणि विजेच्या सुविधेअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी दुःखद प्रसंगी एकत्र येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


निर्मल कृष्ण अमरधाम परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून, नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या तसेच इतर वापरासाठी पाण्याची कोणतीही योग्य सोय उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी साधा एक दिवाही उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.


अमरधामसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी स्वच्छता, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र, या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करावी, पाण्याची व्यवस्था करावी आणि आवश्यक ठिकाणी विद्युत दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, या प्रश्नावर राहुरी फॅक्टरी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव यांनी आवाज उठवला आहे. निर्मल कृष्ण अमरधामची तातडीने स्वच्छता करून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत