सांगवी, पिंपरी चिंचवड(वेबटीम) नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सांगवी येथे माजी नगरसेवक श्री. अतुल नानासाहेब शितोळे आणि ग्लोबल वेल-बिइंग प्रोग्...
सांगवी, पिंपरी चिंचवड(वेबटीम)
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सांगवी येथे माजी नगरसेवक श्री. अतुल नानासाहेब शितोळे आणि ग्लोबल वेल-बिइंग प्रोग्राम्स (GWBP) यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. कोमल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात नागरिकांची रक्तदाब (बीपी) व मधुमेह तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. मधुमेहाचे संभाव्य दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ग्लोबल क्लिनिकच्या डॉ. कोमल पवार आणि संशोधक श्री. अनिल घनवट यांनी आयुर्वेद, आरोग्य संवर्धन आणि रोगप्रतिबंधक उपायांबाबत माहिती दिली. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य दिनचर्या आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यांच्या माध्यमातून आजारांचा धोका कमी करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या शिबिराचा सांगवी परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. अशा उपक्रमांमुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना मिळून निरोगी समाजनिर्मितीस हातभार लागतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत