राहुरी फॅक्टरीत श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठानचा १८ वा नवरात्रोत्सव ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान कीर्तन, भारूड; २६ ऑक्टोबरला भव्य भंडारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठानचा १८ वा नवरात्रोत्सव ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान कीर्तन, भारूड; २६ ऑक्टोबरला भव्य भंडारा

राहुरी फॅक्टरी / वेबटीम:-  श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाचे यंदा १८ वे वर्ष असून, रविवार, ११ ऑक्टोबरपासून सोम...

राहुरी फॅक्टरी / वेबटीम:-

 श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाचे यंदा १८ वे वर्ष असून, रविवार, ११ ऑक्टोबरपासून सोमवार, १९ ऑक्टोबरपर्यंत श्री सप्तशृंगी माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त कीर्तन, भारूड आणि काल्याच्या कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.

श्री सप्तश्रृंगी युवा प्रतिष्ठान, चालक-मालक संघटना आणि व्यापारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुरी फॅक्टरी, राहुरी तसेच परिसरातील भाविकांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ११ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. चैतन्य महाराज कोबरणे यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज शिंदे, मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. भास्कर महाराज कोळी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी भारुडाचा कार्यक्रम होईल.

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. बाबा महाराज मोरे यांचे कीर्तन, शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी कणकावती आराधी मंडळाचा कार्यक्रम, तर शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांचे कीर्तन होणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. बाबासाहेब महाराज वाळुंज यांचे कीर्तन होईल.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. विकास महाराज हापसे (शरण्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, गणेशगाव) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचे अन्नदाते चारुदत्तभाऊ पवार (चारुदत्त ऑईल एजन्सी व पेट्रोलियम) आहेत. या कीर्तनाने नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

नवरात्रोत्सवानंतर सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठान, चालक-मालक संघटना आणि व्यापारी वर्ग यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होणार आहे.

राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर, ग्राहक भंडारासमोर, श्री शिवाजीनगर येथे हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. परिसरातील भाविकांनी कीर्तन, भारूड आणि भंडाऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत